पर्मनन्ट अकाउन्ट नंबर(PAN)
भारतीय आयकर कायदा, १९६१ अंतर्गत पॅन सर्व भारतीयांना दिला जातो. वब्हंशी आर्थिक व्यवहार करताना पॅन असणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीचा पॅन ही केवळ त्या व्यक्तीचीच ओळख असते. पॅनकार्डाचा उपयोग हा आयकर विवरण (रिटर्न) भरताना, टीडीएस दाखवताना, टीडीएसचा परतावा मागताना, आयकर विभागाबरोबर कोणताही पत्रव्यवहार करताना तसेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना पॅन लिहिणे गरजेचे करण्यात आले आहे. बँक खाते उघडायचे झाल्यास, टेलिफोनची नवी जोडणी हवी असल्यास, मोबाइलचा नवा नंबर हवा असल्यास, परकीय चलन खरेदी करताना, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत ठेवताना किंवा काढताना, नवे वाहन खरेदी करताना इत्यादी जवळपास प्रत्येक व्यवहारासाठी आता पॅन असणे जरुरी आहे. ज्या ग्राहकांकडे पॅन कार्ड नसेल त्या ग्राहकांच्या सोयीसाठी शिवदौलत सहकारी बँकेने प्रत्येक शाखेत पॅन कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, या सुविधांचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा.
पॅनकार्डसाठी खालील कागदपत्र आवश्यक आहेत.
पॅन क्रमांक घेणे हे ऐच्छिक आहे. यासाठी अर्ज करावा लागतो. या अर्जाबरोबर अर्जकर्त्याचे २ रंगीत फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, जन्मदिनांक आणि शुल्क इत्यादी द्यावे लागतात. अर्ज केल्यापासून १० ते १५ दिवसांत पोस्टाने पॅनकार्ड घरी येते.