घर बांधणी कर्ज

कर्ज कोणास घेता येईल ?

1. अशा प्रकारचे कर्ज घेण्यासाठी बँकेचा अ वर्ग सभासद होणे आवश्यक आहे.

2. अर्जदार व जामिनदार कर्ज रक्कम परतफेडीचे दृष्टीने उत्पन्नधारक असावेत.

कर्जाची रक्कम :-

कर्जाची वैयक्तिक कमाल मर्यादा (विनातारण) रिझर्व्ह बँक व मा.संचालक मंडळाच्या आदेशानुसार वेळोवेळी ठरविण्यात येईल.

कर्जाचे कारण/तारण :-

1. घर बांधणी/फ्लॅट खरेदी/घर दुरूस्ती

2. कमाल कर्ज मर्यादा – घराच्या मुल्यांकनाच्या जास्तीत जास्त 70% पावेतो.

3. परतफेडीची मुदत (कमाल) – 20 वर्षे (240 महिने) राहील.

4. व्याजदर द.सा.द.शे. 12% व दंडव्याज द.सा.द.शे. 2% प्रमाणे आकारण्यात येईल. सदरचा व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार संचालक मंडळास राहतील.

जूने घर खरेदी :-

1. कमाल कर्ज मर्यादा – घराच्या मुल्यांकनाच्या जास्तीत जास्त 70% पावेतो.

2. परतफेडीची मुदत (कमाल) – 15 वर्षे (180 महिने) राहील.

3. व्याजदर द.सा.द.शे. 12% व दंडव्याज द.सा.द.शे. 2% प्रमाणे आकारण्यात येईल. सदरचा व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार संचालक मंडळास राहतील.

दुरावा (मार्जिन) :-

1. नविन घरासाठी 20% व जुन्या घरासाठी / घर बांधकामासाठी 30% दुरावा ठेवण्यात येईल व दुराव्याची रक्कम बचत/चालु खात्यात जमा केलेली असावी.

2. घर बांधकामाच्या इस्टिमेटच्या 70% कर्ज मंजूर करण्यात येईल.


< वैयक्तिक कर्ज सोनेतारण कर्ज >