इतर कर्ज
कर्ज कोणास घेता येईल ?
1.कर्जासाठी अर्जदार व जामिनदार अ वर्ग सभासद असावे.
2.अर्जदार व जामिनदार कर्ज रक्कम परतफेडीचे दृष्टीने उत्पन्नधारक असावेत.
कर्जाची रक्कम :-
कर्जाची कमाल मर्यादा रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार वेळोवेळी ठरविण्यात येईल.
व्याजाचा दर व व्याज आकारणी :-
विनातारणी कर्जासाठी द.सा.द.शे. 15% दराने व्याजाची आकारणी मासिक पद्धतीने करण्यात येईल. थकबाकीवर 2% दंडव्याज आकारण्यात येईल. मात्र सदर कर्जासाठी आकारणी मासिक पद्धतीने करण्यात येईल. सदरचा व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार वेळोवेळी बदल अधिकार बँकेच्या संचालक मंडळास राहील.
परतफेड :-
1. सदर कर्जाची मुदत 1 ते 3 वर्षे राहील.
2. कर्ज व्यवहार असमाधानकारक असल्यास (सलग 3 हप्ते थकविल्यास खाते एनपीए झाल्यास) संपूर्ण कर्जाची एकरकमी व्याजासह परतफेड करावी लागेल.