मुख्य कार्यालय व विभाग
(दुसरा व चौथा शनिवार बँकेस सुट्टी राहील) contact@shivdaulatbank.com sdsbankho@gmail.com jshivajirao@rediffmail.com
शिवदौलत सहकारी बँकेच्या २० व्या वार्षिक सभेनिमित्त्त.....
सभासद बंधु भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,
शिवदौलत सहकारी बँकेने आपणा सर्वांच्या विश्वासाहार्य पाठबळावर यशस्विरीत्या रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू केलेली आहे.बँकेच्या विसाव्या वार्षिक अहवालच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधताना आनंद होत आहे,पण या आनंदाला यंदा काही प्रमाणात काळजीची व दुखा:ची झालर आहे. संपलेल्या आर्थिक वर्षात कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेस आपणास सामोरे जावे लागले. कोरोना जगतीक महामारीमुळे अनेकांनी आपले उद्योग, रोजगार गमावले तसेच अनेक जिवाभावाचे सहकारी आपणास कायमचे सोडून गेले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना म्हणून देशात अहवाल सालात वेळोवेळी टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन लावण्यात आले. टाळेबंदीच्या काळात बँक ही अत्यावश्यक सेवा होती. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, आपल्या शिवदौलत बँकेच्या मुख्य कार्यालयासह सर्वच शाखा पुर्णत: कार्यन्वीत होत्या, तथापी निर्बंधांमुळे बँकिंग व्यवसाय प्रभावित झाला पण बँकेने आपली व्यवसाय वाढ कायम ठेवली आहे. यावर्षी बँकेच्या ठेवी मध्ये १३.५६ कोटीची वाढ, बँकेचा एकूण व्यवसाय २१.२७ कोटीची वाढ होवून २०० कोटी व्यवसायाचा टप्पा बँकेने ओलांडला आहे.मागील आर्थिक वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सभासदांना आपण लाभांश देऊ शकलो नाही. मात्र गतवर्षीप्रमाणे बँकेस चांगला नफा झाला असल्याने सभासदांना आपण यावर्षी पुर्वीप्रमाणे ११% लाभांश देण्याची शिफारस करत आहोत.कोरोना विषाणूंच्या संक्रमनामुळे संपुर्ण जगाची कार्यपद्धतीच बदलत चालली आहे. कोरोना पुर्वीचे जग आणि कोरोना नंतरचे जग असाच जगाचा इतिहास यापुढे लिहला जाईल.कोरोनाच्या नंतरच्या जगात वावरताना नवीन अव्हाने पेलण्यासाठी आपली बँक सज्ज आहे. आपणही सभासद, ग्राहक, कर्जदार,ठेवीदार म्हणून नव्या बदलांचा विचार स्विकार करत बँकेला सहकार्य कराल याची मला खात्री आहे.वेळेत कर्ज परतफेड करणे असो किंवा बँकिंग व्यवहारासाठी आपल्या बँकेच्या विविध सेवांचा वापर करणे असो, या सगळ्यांसाठी तुम्ही सहकार्य कराल ही अपेक्षा. अहवाल सालात केलेल्या चांगल्या कामाबद्दल संचालक मंडळ,अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना शुभाशिर्वाद व पुढील कामासाठी शुभेछ्या देतो आणि आपले आभार माणुन माझे मनोगत संपवतो.
जय हिंद.....जय महाराष्ट्र...... जय सहकार......
दौलतनगर,मरळी नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब
संस्थापक व मार्गदर्शक