चालू खाते
पात्रता
कोणतीही भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती ( स्वतःच्या नावावर अथवा दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रितपणे), एकमालक संस्था, भागिदारी संस्था, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, पब्लिक लिमिटेड कंपन्या, नोंदणीकृत सहकारी संस्था, क्लब, संघटना इ. चालू खाते आमच्या बँकेत उघडू शकतात.
वैशिष्ट्ये आणि लाभ
- कमीत कमी रक्कम रु. 1000/- सह खाते उघडता येते.
- चेक बुक सुविधा
- कोअर बँकिंग सुविधा
- खातेवरील व्यवहारांची माहिती एस एम एस द्वारे
- आर टी जी एस / एन ई एफ टी सुविधा
- सर्व प्रकारचा कर भरणा(tax), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती विमा योजना उपलब्ध.
वैध आवश्यक कागदपत्रे
किमान दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि अधिकृत कागदपत्रांपैकी एखादे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून खालीलपैकी कागदपत्रे आवश्यक,
1. निवासाचा पुरावा* (आधार कार्ड, पासपोर्ट, वाहक परवाना, मतदार ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल, अलीकडचे बँक खाते स्टेटमेंट, आयकर/ संपत्ती कर आकारणी आदेश, कायमस्वरूपी निवासाच्या पुराव्यासहित नोंदणीकृत किंवा नोटराईज्ड लिव्ह अँड लायसन्स करार इ. )
2. फोटोसहित ओळखपत्र* (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहक परवाना, मतदार ओळखपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, नामांकित कंपनीने दिलेले ओळखपत्र इ.)
3.बँकेला परिचित आणि स्वीकारार्ह असलेल्या व्यक्तीची ओळख
4.सत्यता पडताळणीकरता मूळ पॅन कार्डासह त्याची छायाप्रत.
5.रोखीमध्ये प्रारंभिक ठेव
6. व्यवसायाचा पुरावा
7. व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा
8. संस्थेच्या घटनेनुसार असलेली अन्य कागदपत्रे (खालीलप्रमाणे )
एक मालक संस्था
1. दुकान व संस्थानोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत , विक्री कर अधिकरण/ सेवा कर अधिकरण / व्यवसाय कर अधिकरण यांनी जारी केलेले कुठलेही प्रमाणपत्र/ नोंदणीपत्र, ताज्या ताळेबंदाच्या व प्राप्तिकर विवरणपत्राच्या लेखापरिक्षित प्रती, व्यवसाय सुरू असण्याबद्दल चार्टर्ड अकाऊंटंटचे पत्र,पत्त्याचा पुरावा दुकान/ संस्था (वीज बिल, टेलिफोन बिल, ताजे बँक खाते स्टेटमेंट, आयकर/संपत्ती कर आकारणी आदेश, सोसायटीचे देखभाल वर्गणी बिल, नोंदणीकृत किंवा नोटराईज्ड लीव्ह अँड लायसन्स करार इ.)
2. मालकी हक्काचे पत्र
भागिदारी संस्था
1. संस्था व सर्व भागिदारांची पॅन कार्डे, सत्यता पडताळणीकरता मूळ पॅन कार्डासह त्याची छायाप्रत.
2. व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा दुकान/ संस्था
3. भागिदारी पत्र
4. भागिदारांची यादी
5. नोंदणी प्रमाणपत्र
6. नोंदणीकृत भागिदारीचा करार
मर्यादीत कंपन्या
1. कंपनी व सर्व संचालकांची पॅन कार्डे, सत्यता पडताळणीकरता मूळ पॅन कार्डासह त्याची छायाप्रत.
2. कंपनीच्या पत्त्याचा पुरावा
3. नोंदणी प्रमाणपत्र
4. संचालकांची यादी
5. कंपनीचा CIN क्रमांक व सर्व संचालकांचे DIN क्रमांक
6. व्यवसाय सुरू झाल्याचे प्रमाणपत्र (पब्लिक लिमिटेड कंपन्यांकरिता)
7. संस्थेचा शिक्का(सील)
8. संस्थेचा ठराव
9. संस्थेचे नियम व उपनिधी